Posts

Showing posts from March, 2024

Ati Tithe Mati

Image
 Ati Tithe Mati अति तेथे माती मित्रांनो यश आणि प्रसिद्धी सहजा सहजी मिळत नाही आणि मिळाली तरी काही जणांना ती टिकवून ठेवता येत नाही. मिळालेल्या गोष्टीचा मनुष्यप्राणी अतिरेक करायला लागतो आणि आत्ता पर्यन्त जे काही कमावले त्याची माती करून टाकतो. एका गावात एक गरीब शेतकरी होता, तो शेतात राबराब रबायचा पण पण निसर्गामुळे म्हणा किंवा त्याच्या नशिबामुळे म्हणा त्याला त्याच्या कामात यश मिळत नव्हत. तो देवाची विनवणी करू लागला. त्याची ती दशा पाहून देवाला फार वाईट वाटले. एके दिवशी तो शेतकरी आत्महत्येचा विचार करत बसला होता. त्याच वेळी देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला "तुला काय अपेक्षित आहे ते माग, मी तुला ते देईन. धन, धान्य, वस्त्र, गृह, सुख, शांती, यश, प्रसिद्धी काय हवे ते माग, पण जे मागशील ते तुला तुझ्या झोळीत घ्यावं लागेल. मी जे देईन ते घेताना त्यातील एक कण जरी झोळीतून खाली पडला तर सर्व काही नाहीसे होईल." शेतकऱ्याने विचार केला जर आपल्याकडे धन आले तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला आपसूकच मिळतील. त्याने देवाकडे धनाची अपेक्षा केली आणि आपली झोळी उघडली. त्याचक्षणी देवाने त्याला थोडे

How to write

Image
 How to write लेखन कसे करावे लेखन हे सध्या खूप प्रतिष्ठित करियर आहे. लेखकांना त्यांनी केलेले लिखाण सर्वांनी वाचावे असे वाटते. पण काही काही वेळेस लेखनास सुरवात कुठून करावी तेच सुचत नाही. माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्या आधी स्वतःच्या अपेक्षेची पूर्तता करावी. प्रत्येक लेखकाची एक वेगळी थाटणी असते त्या थाटाणितच तो लेखन करतो. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. हे सर्व करताना बराच वेळ खर्च होतो, अश्या वेळी आपल्याला स्वतःला समाधान वाटते का हे अधिक महत्वाचे. लेखन म्हणजे शब्दांचा खेळ. ह्याची सुसंगत मांडणी करून एका सरळ रेषेत शब्दात्मक रूप आपल्याला मांडता आले पाहिजे. लिखाण हे कधीही डोक्याने करू नये ते मनातून आले पाहिजे. कोणताही विषय लिहिताना तो आपल्या मनाला भावला पाहिजे. लेखन म्हणजे मनात आलेल्या भावनांना मेदूच्या सहाय्याने शब्दांकित करून लेखणीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे मांडणे असे मला वाटते. लेखन करताना आपण कोणत्या वयोगटासाठी लेखन करत आहोत ह्याचे मुळात आपल्याला भान असणे गरजेचे आहे. लेखन हे नेहमी विषयाला धरून असावे. लिखाण करताना आपण कुठे भरकटत तर नाही आहोत ना ह्याचे आपल्या

How to Read

Image
How to read   वाचन कसे करावे वाचन ही एक कला आहे, ही कला ज्याला जमली त्याने वाचनावर प्रभुत्व मिळविले म्हणून समजा. वाचन करताना तुम्ही कोणता विषय वाचत आहात त्या विषयाला समजून वाचन करावे. माणूस वाचन ज्ञानासाठी, आनंद म्हूणन किंवा आवड म्हणून करतो. विषयाला समजून घेऊन जर वाचन केलात तर ते वाचताना तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळाला की तुम्हाला त्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुमच्या ज्ञानात आपसूकच भर पडेल. केलेले सर्व वाचन तुम्हाला समजेलच असे नाही, पण ते समजेल अश्या पद्धतीने आपण वाचन केले पाहिजे. वाचन करताना कोणतेही वाक्य सरसकट वाचू नये. योग्य ठिकाणी खंड पाडून वाक्याचे वाचन करावे. चुकीच्या ठिकाणी खंड पडल्याने वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे खंड कुठे पडावा हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. वाचन करताना 100 टक्के अवधान म्हणजे लक्ष वाचत असलेल्या विषयावर केंद्रित करायला हवे, अन्यथा वाचून स्मरण होण्याऐवजी विस्मरण होण्याची अधिक शक्यता असते. सलग वाचणे जमत नसेल तर ते वाचन टप्या टप्यात करावे. त्यासाठी ठराविक वेळ ठरवावी. मी वाचन आणि लेखन दोन्ही करतो! त्या साठी मी माझा प्रवासातला वेळ स

When the person gets out of mind!

Image
 When the person gets out of mind! व्यक्ती मनातून उतरते तेव्हा! आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा त्याच्या पात्रते पेक्षा जास्त मान देतो अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या विरुद्ध वागते, बोलते किंवा दुसऱ्यास वागण्यास भाग पाडते तेव्हा अशी व्यक्ती मनातून उतरून जाते. कारण त्या वेळेस आपल्या विश्वासाला न जोडणारा तडा गेलेला असतो. त्या व्यक्तीला मात्र याचा काहीच फरक पडत नाही, कारण मुळात ती व्यक्ती त्याच हेतूने तुमच्या संपर्कात आलेली असते. पण असे करताना त्याच्या पंखात किती बळ आहे हे त्या व्यक्तीलाही माहित नसते. नियतीची मती आणि काळाची गती ही कुणालाच माहित नसते. समोरची व्यक्ती कितीही खालच्या स्थरारावर गेली तरी आपण मात्र तसे वागू नये. प्रत्येलाला आपापल्या कर्माच फळ हे मिळणारच आहे. अशी माणसं समाजात, नात्यात, कामाच्या ठिकाणी सतत सामोरी येतात आणि आपल्याला त्यांच्या सोबत व्यवहार करावा लागतो. आपण सर्व सामान्य माणसं आहोत त्यामुळे अहंकार कुरवाळत बसणं आपल्याला परवडण्या सारखं नाही. त्यामुळे आहे ते वास्तव स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं! हे सर्व मी अनुभवातून शिकलोय. आपण अश्या व्यक्तीवर पुष्कळ विश्वास टाकला हा