Posts

Showing posts with the label Heart

How to write

Image
 How to write लेखन कसे करावे लेखन हे सध्या खूप प्रतिष्ठित करियर आहे. लेखकांना त्यांनी केलेले लिखाण सर्वांनी वाचावे असे वाटते. पण काही काही वेळेस लेखनास सुरवात कुठून करावी तेच सुचत नाही. माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्या आधी स्वतःच्या अपेक्षेची पूर्तता करावी. प्रत्येक लेखकाची एक वेगळी थाटणी असते त्या थाटाणितच तो लेखन करतो. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. हे सर्व करताना बराच वेळ खर्च होतो, अश्या वेळी आपल्याला स्वतःला समाधान वाटते का हे अधिक महत्वाचे. लेखन म्हणजे शब्दांचा खेळ. ह्याची सुसंगत मांडणी करून एका सरळ रेषेत शब्दात्मक रूप आपल्याला मांडता आले पाहिजे. लिखाण हे कधीही डोक्याने करू नये ते मनातून आले पाहिजे. कोणताही विषय लिहिताना तो आपल्या मनाला भावला पाहिजे. लेखन म्हणजे मनात आलेल्या भावनांना मेदूच्या सहाय्याने शब्दांकित करून लेखणीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे मांडणे असे मला वाटते. लेखन करताना आपण कोणत्या वयोगटासाठी लेखन करत आहोत ह्याचे मुळात आपल्याला भान असणे गरजेचे आहे. लेखन हे नेहमी विषयाला धरून असावे. लिखाण करताना आपण कुठे भरकटत तर नाही आहोत ना ह्याचे आप...

When the person gets out of mind!

Image
 When the person gets out of mind! व्यक्ती मनातून उतरते तेव्हा! आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा त्याच्या पात्रते पेक्षा जास्त मान देतो अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या विरुद्ध वागते, बोलते किंवा दुसऱ्यास वागण्यास भाग पाडते तेव्हा अशी व्यक्ती मनातून उतरून जाते. कारण त्या वेळेस आपल्या विश्वासाला न जोडणारा तडा गेलेला असतो. त्या व्यक्तीला मात्र याचा काहीच फरक पडत नाही, कारण मुळात ती व्यक्ती त्याच हेतूने तुमच्या संपर्कात आलेली असते. पण असे करताना त्याच्या पंखात किती बळ आहे हे त्या व्यक्तीलाही माहित नसते. नियतीची मती आणि काळाची गती ही कुणालाच माहित नसते. समोरची व्यक्ती कितीही खालच्या स्थरारावर गेली तरी आपण मात्र तसे वागू नये. प्रत्येलाला आपापल्या कर्माच फळ हे मिळणारच आहे. अशी माणसं समाजात, नात्यात, कामाच्या ठिकाणी सतत सामोरी येतात आणि आपल्याला त्यांच्या सोबत व्यवहार करावा लागतो. आपण सर्व सामान्य माणसं आहोत त्यामुळे अहंकार कुरवाळत बसणं आपल्याला परवडण्या सारखं नाही. त्यामुळे आहे ते वास्तव स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं! हे सर्व मी अनुभवातून शिकलोय. आपण अश्या व्यक्तीवर पुष्कळ विश्वास टाकल...