Posts

Showing posts with the label Maharaj

SHIVJAYANTI

Image
SHIVJAYANTI शिवजयंती  छत्रपती शिवाजी महाराज! असा राजा होणे नाही हे एक अटळ सत्य. जे प्रत्येकाने स्वीकारलेच पाहिजे. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" नुसता नावाचा उच्चार जरी केला तरी अंगात हजार हत्तींचे बळी येऊन जाते. अशा या राजास माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय राजे आणि मराठी सम्राज्याजे खरे संस्थापक होते आणि शेवट पर्यन्त राहणार. आदिलशाहिच्या जाचातून छत्रपती शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट ठरली. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले ही काळ्या दगडा वरील पांढरी रेघच म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. गमिनी काव्याच्या तंत्राने  त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अश्या मुघल आणि आदिलशहा फौजांचा यशस्वीपणे सामना केला. छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक आहेत हे कुणी नाकारू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...