SHIVJAYANTI

SHIVJAYANTI

शिवजयंती 

SHIVJAYANTI

छत्रपती शिवाजी महाराज! असा राजा होणे नाही हे एक अटळ सत्य. जे प्रत्येकाने स्वीकारलेच पाहिजे. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" नुसता नावाचा उच्चार जरी केला तरी अंगात हजार हत्तींचे बळी येऊन जाते. अशा या राजास माझा मानाचा मुजरा.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय राजे आणि मराठी सम्राज्याजे खरे संस्थापक होते आणि शेवट पर्यन्त राहणार. आदिलशाहिच्या जाचातून छत्रपती शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

SHIVJAYANTI

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट ठरली. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले ही काळ्या दगडा वरील पांढरी रेघच म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. गमिनी काव्याच्या तंत्राने  त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अश्या मुघल आणि आदिलशहा फौजांचा यशस्वीपणे सामना केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक आहेत हे कुणी नाकारू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती  म्हणून आपण सर्वजण साजरा करतो.

छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून ही एक दैवी शक्ती आहे. हे ज्याला समजले तोच खरा ज्ञानाने श्रीमंत माणूस समजावा. शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात दोनदा साजरी होते.

SHIVJAYANTI

आमच्या लहानपणी शिवजयंतीला मिरवणूका काढल्या जायच्या ज्यात प्रतिकात्मक राजे पुढे असायचे आणि आम्ही सर्व त्यांच्या मागे चालत असायचो. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय" "हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो" अश्या घोषणा देत आम्ही निघायचो. अगदी शिस्तबद्ध पद्धतीच्या मिरवणूका असायच्या. आता त्याचे स्वरुप पूर्णपणे बदलेले आहे, काळानुसार बदल हा आवश्यक ही आहे. पण फक्त ढोल ताशाचा आवाज डीजेचा आवाज म्हणजे शिवजयंती नव्हे, तर दूरदृष्टी, संयम, एकग्रता, सखोल विचार करण्याची शक्ती, अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता आणि स्त्रियांचा आदर करणे ज्याला जमले त्यानेच खरी शिवजयंती साजरी केली असे म्हटले पाहिजे.


लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse