Lekhan Aani Vachan Paraspar Sambandh

 Lekhan Aani Vachan Paraspar Sambandh

लेखन आणि वाचन ह्यांचा परस्पर संबंध.

Lekhan Aani Vachan Paraspar Sambandh

लेखन आणि वाचन ह्यांचा परस्पर संबंध तसा गुंतागुंतीचा आहे, असं मला तरी वाटतं! 


माझ्या मते लेखन आणि वाचन एकमेकांना पूरक आहेत किंबहुना दोघांची तुलना अशी होऊ शकत नाही.


पण लेखन करण्यासाठी पुष्कळ वाचनाची आवश्यकता आहे आणि चांगले वाचण्यासाठी चांगले लिखाण असणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.


वाचनाने शब्द भांडार  वाढत जातो. शब्दांचा शब्दांशी असलेला खरा खेळ समजतो, ते वाचन कोणत्याही क्षेत्रातील असेल तरी चालेल लेखन करताना मग हे शब्द उपयोगी पडतात. एकाच शब्दाचे समानार्थी दुसरे शब्द मिळाले की आपल्या लेखनाला धार येते.


Lekhan Aani Vachan Paraspar Sambandh


म्यानातून धगधगती तलवार बाहेर पडावी तसे शब्द बाहेर पडतात. लेखणी हे सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. पण त्याला शब्दांची धार नसेल तर ती लेखणी रुपी तलवार बोथट वाटू लागते.


शब्द माणसं जोडतात तर माणसं तोडतात सुद्धा. मग ते लेखणीतून असू देत नाही तर वाचेतून, म्हणून शब्द जपून वापरावेत ! चांगले वाचाल तर चांगले विचार मनात येतील, तेच विचार लेखणीच्या माध्यमातून बाहेर पडतील. शब्दरूपी सोन्याची उधळण वाचन आणि लेखन या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी उधळण्याची सोनेरी संधी मिळेल त्यासाठी माध्यम काहीही असेल वाचन किंवा लेखन...!


 लेखन - मनिष महादेव जोशी

 कोकण कल्चर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse