Anger and Rage

 Anger and Rage

राग आणि क्रोध

Anger and Rage

राग आणि क्रोध ह्या दोन शब्दात पुष्कळ फरक आहे. राग आणि क्रोधच्या मध्ये एका टिशू पेपर ची पात्तळ अशी भिंत आहे. त्यात पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी रागाचे रूपांतर क्रोधात झाले म्हणून समजा.

भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि क्रोधाच्या अग्नित काम देवाचा अंत झाला

भगवान श्रीरामाने समुद्राला धडा शिकवण्या साठी धनुष्यावर बाण चढवीला होता.

महाभारतातील युद्ध दरम्यान क्रोधित होऊन भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्म ह्यांच्यावर प्रहार करण्याच्या हेतूने रथाचे चाक उचललेच. युद्धापूर्वी त्यांनी मी हत्यार उचलणार नाही असे सांगितले होते.

त्यातून त्यांनी संदेश दिला की प्रसंग - वेळ - परिस्थिती - आवश्यकता - गरज ह्यानुसार माणसाने निर्णय - प्रण - प्रतिज्ञा - निश्चय ह्यात बदल करणे गरजेचे आहे.

पौराणिक कथेतून असे ज्ञात होते की अनेकदा देवालाही क्रोध अनावर झाला आहे, पण त्यांनी क्रोधाचा योग्यवेळी आणि योग्य रीतीने वापर केला.

Anger and Rage

एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतो. प्रत्येकाला वाटते की आपण जे वागतो ते बरोबर आहे, किंबहुना सर्वांनी माझ्या सारखेच वागले पाहिजे. आता प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो आणि स्वभावाला औषध नसते किबहुना कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपली चिडचिड वाढत जाते आणि हळू हळू आपल्याला राग येतो. हा राग जेव्हा उच्च कोटीला जाऊन पोहोचतो तेव्हा क्रोध जास्त उफाळी घेऊ लागतो. आपल्या रागावर आपणच अंकुश बसवायला शिकले पाहिजे. 

मनुष्य हा चुकणारा प्राणी आहे, पण किती चुका कराव्यात ह्यालाही काही मर्यादा आहेत. एखादी व्यक्ती चुकत असेल तर तिला समजावून सांगा त्या गोष्टीचा राग राग करत बसू नकात, कारण रागात घेतलेले बहुतेक निर्णय हे चुकीचेच ठरतात.

तुमच्या रागाचा त्रास तुम्हालाच होतो, समोरच्याला काहीही फरक पडत नाही. सतत राग केल्याने बीपी तुमचा वाढणार, औषध तुम्हाला खावी लागणार, खर्च तुमचा वाढणार. त्यामुळे विनाकारण रागावणे टाळा.

राग हा आपल्याला एकदाच येतो, पण जाताना सर्व काही घेऊन जातो.

क्रोधाच्या वणव्यात आपण स्वतःच स्वतःला जाळत जातो!


लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

KARMA

A Horse