How to Read

How to read 

वाचन कसे करावे

How to Read

वाचन ही एक कला आहे, ही कला ज्याला जमली त्याने वाचनावर प्रभुत्व मिळविले म्हणून समजा.

वाचन करताना तुम्ही कोणता विषय वाचत आहात त्या विषयाला समजून वाचन करावे. माणूस वाचन ज्ञानासाठी, आनंद म्हूणन किंवा आवड म्हणून करतो. विषयाला समजून घेऊन जर वाचन केलात तर ते वाचताना तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळाला की तुम्हाला त्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुमच्या ज्ञानात आपसूकच भर पडेल. केलेले सर्व वाचन तुम्हाला समजेलच असे नाही, पण ते समजेल अश्या पद्धतीने आपण वाचन केले पाहिजे.

वाचन करताना कोणतेही वाक्य सरसकट वाचू नये. योग्य ठिकाणी खंड पाडून वाक्याचे वाचन करावे. चुकीच्या ठिकाणी खंड पडल्याने वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे खंड कुठे पडावा हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. वाचन करताना 100 टक्के अवधान म्हणजे लक्ष वाचत असलेल्या विषयावर केंद्रित करायला हवे, अन्यथा वाचून स्मरण होण्याऐवजी विस्मरण होण्याची अधिक शक्यता असते.

How to Read

सलग वाचणे जमत नसेल तर ते वाचन टप्या टप्यात करावे. त्यासाठी ठराविक वेळ ठरवावी. मी वाचन आणि लेखन दोन्ही करतो! त्या साठी मी माझा प्रवासातला वेळ सत्कर्मी लावतो. सकाळी ट्रेन ने प्रवास करताना बसायला मिळते त्या वेळेत मी लिखाण करतो आणि संध्याकाळी परतीच्या वेळेस ट्रेन मध्ये जास्त गर्दी असते, लिहणे जमत नाही त्या वेळेस मी वाचन करतो. अगदी सोप्प आहे ते. तुम्ही तुम्हाला कोणता वेळ वाचना साठी देता येतो ते पहा आणि वाचन करा.

वाचताना प्रत्येक शब्द समजून घ्या. एखादा शब्द नाही समाजाला तर शब्द कोषात जाऊन त्याची माहिती मिळावा. एकाच शब्दाचे वेगवेगळे समानार्थी शब्द तुम्हाला सापडतील. स्वतःचा शब्द भंडार वाढावा. वाचलेले शब्द हे वेचलेल्या मोत्यांप्रमाणे असतात. अश्या अनगणित मोत्यांची माळ तयार करा.

एक गोष्ट लक्षात ठेवा वाचन सवडी प्रमाणे नव्हे तर आवडी प्रमाणे करावे. हळू हळू वाचनाची गोडी निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यात एका वाचन नावाच्या मित्राची भर पडेल. जो तुम्हाला कोणत्याही प्रसंगी एकटे पणाची जाणीव होऊ देणार नाही.

वाचूनी शब्दास आता तू पहा समजूनी जा

वाचनाच्या आवडीने तू आता रंगूनी जा....!


लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse