Posts

Showing posts with the label Like

How to Read

Image
How to read   वाचन कसे करावे वाचन ही एक कला आहे, ही कला ज्याला जमली त्याने वाचनावर प्रभुत्व मिळविले म्हणून समजा. वाचन करताना तुम्ही कोणता विषय वाचत आहात त्या विषयाला समजून वाचन करावे. माणूस वाचन ज्ञानासाठी, आनंद म्हूणन किंवा आवड म्हणून करतो. विषयाला समजून घेऊन जर वाचन केलात तर ते वाचताना तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळाला की तुम्हाला त्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुमच्या ज्ञानात आपसूकच भर पडेल. केलेले सर्व वाचन तुम्हाला समजेलच असे नाही, पण ते समजेल अश्या पद्धतीने आपण वाचन केले पाहिजे. वाचन करताना कोणतेही वाक्य सरसकट वाचू नये. योग्य ठिकाणी खंड पाडून वाक्याचे वाचन करावे. चुकीच्या ठिकाणी खंड पडल्याने वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे खंड कुठे पडावा हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. वाचन करताना 100 टक्के अवधान म्हणजे लक्ष वाचत असलेल्या विषयावर केंद्रित करायला हवे, अन्यथा वाचून स्मरण होण्याऐवजी विस्मरण होण्याची अधिक शक्यता असते. सलग वाचणे जमत नसेल तर ते वाचन टप्या टप्यात करावे. त्यासाठी ठराविक वेळ ठरवावी. मी वाचन आणि लेखन दोन्ही करतो! त्या साठी मी माझा प्रवासातला व...