Posts

Showing posts with the label Line

How to write

Image
 How to write लेखन कसे करावे लेखन हे सध्या खूप प्रतिष्ठित करियर आहे. लेखकांना त्यांनी केलेले लिखाण सर्वांनी वाचावे असे वाटते. पण काही काही वेळेस लेखनास सुरवात कुठून करावी तेच सुचत नाही. माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्या आधी स्वतःच्या अपेक्षेची पूर्तता करावी. प्रत्येक लेखकाची एक वेगळी थाटणी असते त्या थाटाणितच तो लेखन करतो. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. हे सर्व करताना बराच वेळ खर्च होतो, अश्या वेळी आपल्याला स्वतःला समाधान वाटते का हे अधिक महत्वाचे. लेखन म्हणजे शब्दांचा खेळ. ह्याची सुसंगत मांडणी करून एका सरळ रेषेत शब्दात्मक रूप आपल्याला मांडता आले पाहिजे. लिखाण हे कधीही डोक्याने करू नये ते मनातून आले पाहिजे. कोणताही विषय लिहिताना तो आपल्या मनाला भावला पाहिजे. लेखन म्हणजे मनात आलेल्या भावनांना मेदूच्या सहाय्याने शब्दांकित करून लेखणीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे मांडणे असे मला वाटते. लेखन करताना आपण कोणत्या वयोगटासाठी लेखन करत आहोत ह्याचे मुळात आपल्याला भान असणे गरजेचे आहे. लेखन हे नेहमी विषयाला धरून असावे. लिखाण करताना आपण कुठे भरकटत तर नाही आहोत ना ह्याचे आप...

How to Read

Image
How to read   वाचन कसे करावे वाचन ही एक कला आहे, ही कला ज्याला जमली त्याने वाचनावर प्रभुत्व मिळविले म्हणून समजा. वाचन करताना तुम्ही कोणता विषय वाचत आहात त्या विषयाला समजून वाचन करावे. माणूस वाचन ज्ञानासाठी, आनंद म्हूणन किंवा आवड म्हणून करतो. विषयाला समजून घेऊन जर वाचन केलात तर ते वाचताना तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळाला की तुम्हाला त्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुमच्या ज्ञानात आपसूकच भर पडेल. केलेले सर्व वाचन तुम्हाला समजेलच असे नाही, पण ते समजेल अश्या पद्धतीने आपण वाचन केले पाहिजे. वाचन करताना कोणतेही वाक्य सरसकट वाचू नये. योग्य ठिकाणी खंड पाडून वाक्याचे वाचन करावे. चुकीच्या ठिकाणी खंड पडल्याने वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे खंड कुठे पडावा हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. वाचन करताना 100 टक्के अवधान म्हणजे लक्ष वाचत असलेल्या विषयावर केंद्रित करायला हवे, अन्यथा वाचून स्मरण होण्याऐवजी विस्मरण होण्याची अधिक शक्यता असते. सलग वाचणे जमत नसेल तर ते वाचन टप्या टप्यात करावे. त्यासाठी ठराविक वेळ ठरवावी. मी वाचन आणि लेखन दोन्ही करतो! त्या साठी मी माझा प्रवासातला व...