How to write

 How to write

लेखन कसे करावे

How to write

लेखन हे सध्या खूप प्रतिष्ठित करियर आहे. लेखकांना त्यांनी केलेले लिखाण सर्वांनी वाचावे असे वाटते. पण काही काही वेळेस लेखनास सुरवात कुठून करावी तेच सुचत नाही. माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्या आधी स्वतःच्या अपेक्षेची पूर्तता करावी.

प्रत्येक लेखकाची एक वेगळी थाटणी असते त्या थाटाणितच तो लेखन करतो. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. हे सर्व करताना बराच वेळ खर्च होतो, अश्या वेळी आपल्याला स्वतःला समाधान वाटते का हे अधिक महत्वाचे.

लेखन म्हणजे शब्दांचा खेळ. ह्याची सुसंगत मांडणी करून एका सरळ रेषेत शब्दात्मक रूप आपल्याला मांडता आले पाहिजे. लिखाण हे कधीही डोक्याने करू नये ते मनातून आले पाहिजे. कोणताही विषय लिहिताना तो आपल्या मनाला भावला पाहिजे.

लेखन म्हणजे मनात आलेल्या भावनांना मेदूच्या सहाय्याने शब्दांकित करून लेखणीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे मांडणे असे मला वाटते.

How to write

लेखन करताना आपण कोणत्या वयोगटासाठी लेखन करत आहोत ह्याचे मुळात आपल्याला भान असणे गरजेचे आहे. लेखन हे नेहमी विषयाला धरून असावे. लिखाण करताना आपण कुठे भरकटत तर नाही आहोत ना ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे. भरकटत असलेल्याची जाणीव झाली की लेखन थांबवावे. आपण सुरवाती पासून काय लिहिले त्याचे एकदा वाचन करावे, आपण आपल्या ट्रॅक वर परतलो असे वाटले की पुढील लेखनास सुरवात करावी.

उगाजच शब्दाला शब्द जोडून, वाक्याला वाक्य जोडून लिखाण करू नये. असे लिखाण बोचड वाटू लागते. चांगले लिखाण करायचे असेल तर आधी चांगले वाचन करायला शिकले पाहिजे. कारण वाचनाने आपले शब्द भंडारा वाढते. जेवढे जास्त शब्द भंडार आपल्याकडे असते तेवढे आपले लेखन चांगले होते.

शब्द हे सोन्या प्रमाणे असतात तर लेखक का सोनारा प्रमाणे असतो. सोनार जसा सोने तापवून त्याची बारीक तार तयार करून दागिने घडवितो त्या प्रमाणे लेखक शब्दांची सुमन फुले गुलाला प्रमाणे उधळून आपल्या शब्दाचा आधारे एक प्रकारे वातावरण निर्मिती करत असतो, आपल्या लेखणी रुपी शस्त्राच्या सहाय्याने.


संधी समोरून कधीच मिळत नाही

ती आपल्यालाच खेचून आणावी लागते,

आयुष्यात किती अडथळे आले

तरी मी मस्त आहे असेच म्हणावे लागते!


लेखन :- मनिष महादेव जोशी.

कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse