I Learned From Alcohol
I Learned From Alcohol दारू पासून मी शिकलो मी आज दारू पासून काय शिकलो ह्या विषयावर बोलणार आहे, म्हणजे मी दारू चांगली आहे असे म्हणत नाही. मुळात मला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला आवडते. मसुद्र मंथनातून 14 रत्न निघाली होती, त्यातील हे एक अशुभ रत्न म्हटले तरी चालेल. मद्य असुरांना दिले गेले त्यामुळे त्यांची असुरी वृत्ती अजूनच वाढली गेली. दारू पिल्यावर आपल्यामध्ये विस्मृती निर्माण होते, त्यामुळे शरीरातील ताण तणाव कमी झाल्याचा भास होतो. हळूहळू आपले दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागते आणि सरते शेवटी आपण दारू पीत नाही तर दारू आपल्याला प्यायला सुरवात करते असो आपण आपल्या विषयाकडे वाळूया. एकदा मी मित्राच्या हळदी ला गेलेलो. अर्थात तिथे दारू ची पार्टी चालली मी त्यात सभ्यपणाचा आव आणून शिरलो. त्यात माझे काही मित्र आणि मैत्रिणी ही होत्या. थोडीशी पिल्यावर मग आत्मज्ञान पाजळायाला सुरवात झाली. मित्र म्हणाला आपल आयुष्य हे ह्या दारू प्रमाणे आहे आणि त्याने ग्लासात दारू ओतली, दुसऱ्याने विचारले कसे काय तर तो पहिला मित्र म्हणाला "आपण जेव्हा बॅचलर असतो तेव्हा शेर असतो" असं म्हणून त्याने सिगारेट पे...