I Learned From Alcohol

I Learned From Alcohol

दारू पासून मी शिकलो

I Learned From Alcohol

मी आज दारू पासून काय शिकलो ह्या विषयावर बोलणार आहे, म्हणजे मी दारू चांगली आहे असे म्हणत नाही. मुळात मला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला आवडते.

मसुद्र मंथनातून 14 रत्न निघाली होती, त्यातील हे एक अशुभ रत्न म्हटले तरी चालेल. मद्य असुरांना दिले गेले त्यामुळे त्यांची असुरी वृत्ती अजूनच वाढली गेली.

दारू पिल्यावर आपल्यामध्ये विस्मृती निर्माण होते, त्यामुळे शरीरातील ताण तणाव कमी झाल्याचा भास होतो. हळूहळू आपले दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागते आणि सरते शेवटी आपण दारू पीत नाही तर दारू आपल्याला प्यायला सुरवात करते असो आपण आपल्या विषयाकडे वाळूया.

I Learned From Alcohol

एकदा मी मित्राच्या हळदी ला गेलेलो. अर्थात तिथे दारू ची पार्टी चालली मी त्यात सभ्यपणाचा आव आणून शिरलो. त्यात माझे काही मित्र आणि मैत्रिणी ही होत्या. थोडीशी पिल्यावर मग आत्मज्ञान पाजळायाला सुरवात झाली.

मित्र म्हणाला आपल आयुष्य हे ह्या दारू प्रमाणे आहे आणि त्याने ग्लासात दारू ओतली, दुसऱ्याने विचारले कसे काय तर तो पहिला मित्र म्हणाला "आपण जेव्हा बॅचलर असतो तेव्हा शेर असतो" असं म्हणून त्याने सिगारेट पेटवली आणि त्या जळत्या काडीला दारूच्या ग्लासात टाकले. दारू ने पेट घेतला. पण जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा असं म्हणून त्याने सोड्या च्या बॉटल मधला सोडा त्यात ओतला आणि जळत्या काडीला पुन्हा दारूच्या ग्लासात टाकले आता दारूने पेट नाही घेतला. "लग्ना नंतर आपली अशी हालत होते". सगळे हसायला लागले.

मग एक मैत्रीण पुढे आली, तिने आपलं आत्मज्ञान पाजळायाला सुरवात केली. "लग्ना आधी आमचं स्वतःचं अस्थित्व असतं, लग्ना नंतर ते नाहीस होतं, अगदी ह्या बर्फा सारखं". असं म्हणून तिने बर्फाचा एक खडा त्या दारूच्या ग्लासात टाकला. थोड्या वेळाने तो बर्फ वितळला. सगळे हसायला लागले.

I Learned From Alcohol

मी विचार करू लागलो, स्वतःच्या आत्मज्ञानाला आणि अंतर्मनाला प्रश्न विचारू लागलो. नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहू लागलो. एक रिकामी ग्लास हातात घेतला त्यात दारू ओतून ती पिऊ लागलो, घशात जळजळ झाली. पुढचा घोट घ्यायची हिम्मत होईना. मग त्यात सोडा ओतला आणि प्यालो थोडं बरं वाटलं. पण मनाची शांती होईना. मग त्यात एक बर्फाचा खडा टाकला. आता मी दारू पिण्याचा मनमुराद आनंद घेत होतो.

पती पत्नी चं आयुष्य ह्याहून काही वेगळं असू शकतं का. ज्या प्रमाणे दारू पिण्यासाठी निवांत वेळ, ग्लास, दारू, सोडा, बर्फ आणि सुमधुर गीत हे हवं, त्या प्रमाणे आयुष्य सुखाने जगण्यासाठी पती पत्नी चं एकमत होणं गरजेचं आहे. नात्यात कटुता नसेल विश्वास असेल तर दोघेही एकमेकांत रमबाण होतील, एकमेकांना पूरक वेळ देतील. स्वतःचे अस्तित्व स्वतःची ओळख टिकवून ठेवतील आणि आपल्या साथीदाराची ही. 

पती पत्नी ने एकमेकांच्या विचाराने चालून पाहिले तर आयुष्य फार सुंदर होईल हे मला दारू ने शिकवले.

लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse