Happiness and Sadness
Happiness and Sadness
सुख आणि दुःख म्हणजे काय
माझ्यामते सुख आणि दुःख म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू! कोणताही खेळ खेळण्याआधी नाणे उडवून ठरविले जाते कोण पाहिले खेळणार, आणि कोण नंतर. त्याच प्रमाणे जीवनात सुख आणि दुःख ठरवले जाते. वास्तविक पाहता सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख ही परिक्रमा चालूच असते. पण ह्या प्रक्रियेत सर्वाना हवं असतं ते सुखं.
सुखाची किंमत कोणालाही नसते किंवा ते जास्त वेळ टिकून राहत नाही असं म्हणाना, पण दुःखा चा बाऊ मात्र नक्कीच केला जातो. संपूर्ण पृथ्वीतलावर दुःखी आपणच अशी काही लोकांची धारणा असते. अशी माणसं एक तर स्वतःला संपवतात तरी नाहीतर व्यसनाच्या मागे लागून संसाराची वाट तरी लावतात.
काही माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद म्हणजे सुख शोधतात, पण अशी माणसं क्वचितच आढळतात. सुख आणि दुःख ह्याची वेगळी अशी परिमिती काढता येणार नाही कारण सुख किंवा दुःख हे आपल्या मानण्यावर आहे, थोडक्यात त्यांचा करता करावीत म्हणजे मन. शेवटी आपलं मनच ठरवतं की सुख आणि दुःख म्हणजे काय ते.
म्हणजे मनाला आनंद झाला की सुख आणि मन दुखावलं म्हणजे दुःख! सगळा काही मनाचा खेळ.
माझ्या वाढदिवसाला मी पाचशे रुपये खर्च केले आणि माझा वाढदिवस केला, मित्रमंडळी सोबत खाणे पिणे झाले थोडक्यात काय तर मजा मस्ती केली, झालं मन खुश. वाढदिवस संपला दुसऱ्या दिवसा पासून पुन्हा कामाला सुरुवात..... तेच पाचशे रुपये समजा आपल्या कडून हरवले तर निदान तीन रात्री तरी आपल्याला झोप येणार नाही. झुरून झुरून राहणार आपण निदान आठवडा भर तरी, सर्वाना सांगत बसणार माझे पाचशे रुपये हरवले. साहजिकच आहे म्हणा मेहनतीचे पैसे आहेत ते आपल्या.
एका पाचशे रुपयाने सुख दिलं तर एका पाचशे रुपयाने दुःख दिलं. प्रसंग वेगळे होते दोन्ही वेळेस, एक प्रसंग सुख देऊन गेला तर दुसरा प्रसंग दुःख देऊन गेला. सुख नेहमी विहिरीतल्या पाण्या सारख वाटत आणि दुःख समुद्रा एवढं. विहिरीतील पाणी पिऊन स्वतःची तहान भागवायला शिका आणि अथांग सागरात उतरून त्याचा आनंद घ्यायला शिका. दुःखा मध्ये ही सुख शोधा, आपल्या पेक्षा पण किती तरी माणसं दुःखी आहेत ह्याचा विचार करा, मन शांत होईल आणि शांत मन कधीही सुखी असतं. अंधारा मागून उजेड हा येणारच, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. अशे जागा की दुःखा ला ही तुमचा हेवा वाटेल! आणि शेवटी दुःख स्वतः बोलेल नको त्रास देऊया त्याला वेडा आहे तो.....!
लेखन :- मनिष महादेव जोशी
Comments
Post a Comment