When a Faithful Man Deceives us

When a Faithful Man Deceives us

 विश्वासू माणूस आपल्याला फसवत असतो तेव्हा

When a Faithful Man Deceives us

आपण एखाद्या माणसावर पुष्कळ विश्वास टाकतो अगदी आपल्यापेक्षाही जास्त पण तो माणूस खरोखरच त्या विश्वासास पात्र असतो का? आता कुणावर किती विश्वास टाकावा याचं मोजमाप करणार मशीन अजून पर्यंत तरी बाजारात आलं नाही. त्या त्या वेळेस म्हणजे आपल्या गरजेच्या वेळेस जो आपल्यासोबत ठाम उभा राहतो तो आपल्यासाठी जास्त विश्वास पात्र म्हणजे विश्वासू माणूस ठरतो. पण या विश्वासात त्या माणसाचा स्वार्थ लपला असेल तर!

अशी व्यक्ती पहिल्यांदा आपला विश्वास जिंकते. आपल्या स्वप्नांच्या जाळ्यात ती व्यक्ती हळूहळू आपले जाळे विणायला सुरुवात करते. जे स्वप्न आपलं असतं ते स्वप्न त्यांचंही असतं फरक एवढाच असतो किती व्यक्ती आपल्याला अंधारात ठेवत असते, पण आपला त्या व्यक्तीवर असलेला आंधळा विश्वास त्या व्यक्तीने दाखवलेल्या रस्त्यावरून आपल्याला जायला भाग पाडते.

When a Faithful Man Deceives us

कालांतराने आपल्या सोबत राहून राहून काही काळ का असेना त्या व्यक्तीची काही स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होतात स्वप्नांना पंख फुटू लागतात आणि मग चालू होतो तो आपल्या स्वप्नांच जाळ तोडण्याचा खेळ.

भिंतीवरच्या एका कोपऱ्यात एक जाळ तयार झालेलं असतं. एकात एक विणलेलं एका कोळ्याच जाळ! किती शिस्तबद्ध विणलेलं असतं ना ते जाळ! किती दिवसाची मेहनत असते त्या कोळ्याची. पण फक्त आपलं घर साफ करायचं म्हणून आपण ते जाळ तोडून टाकतो. आपल्या घराची साफसफाई झाली, पण त्या जाळ्याचं काय? धुरळा होऊन कचऱ्यात पडलेलं असतं ते जाळ.

आपल्या स्वप्नांच्या जाळ्यांचा धुरळा आपल्या डोळ्यासमोर होताना पाहून सार जग आपल्या डोळ्या समोर गोल गोल फिरू लागलंय असं वाटू लागतं. कारण आपण ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकला त्यानेच आपला विश्वासघात केलेला असतो. मनात नको नको ते विचार घर करू लागतात खरंच आपला विश्वास माणूस आपल्याला फसवत असतो तेव्हा माझ्या मनात एकच विचार येतो.....

जेव्हा आपली नखे वाढतात तेव्हा आपण आपल्या नखांना कापून टाकतो, नखे वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही. त्याप्रमाणे जेव्हा एखाद्या वरचा विश्वास संपवून गैरसमज निर्माण होतात, तेव्हा तुमच्यातल्या अहंकार कापा तुमच्यातल्या नात्यांना कापू नका.

When a Faithful Man Deceives us

फसवणाऱ्यांना फक्त एकच सांगावस वाटतं की नियती कधी कुणाला सोडत नाही, तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळणार! त्या वेळेस नशिबाला दोष देत बसू नका कारण ही पृथ्वी गोल आहे. तुम्ही दुसऱ्याला फसवलं मग तुम्हालाही कुणी फसवलं तर वाईट वाटून घेऊ नकात.

"जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥"

एखाद्यावर विश्वास इतका करा की, तुम्हाला फसवताना तो स्वतःला दोषी समजेल. आता फसवण ही एखाद्याची प्रवृत्तीच असेल तर मात्र आपण काहीही करू शकत नाही.


लेखन :-  मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse