KARMA

KARMA

कर्म

KARMA

मी बऱ्याच वेळा हे ऐकत आलो आहे की "कर्म कर, फळाची अपेक्षा ठेऊ नकोस" आपण आपले कर्म राहायचे त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळणार.

पण विचार केल्यावर असे जाणवते की पुष्कळ वेळेस कर्म करणारा वेगळा आणि त्याची कर्मफळे खाणारा दुसराच असतो, याला काय म्हणायचे?

म्हणजे बघा ना झाडे फळे देतात ती माणूस खातो, गाय म्हैस दूध देतात ते त्यांच्या पिल्लांसाठी पण ते आपण पितो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण मात्र त्याचा नाश जास्त करतो. मनुष्यप्राणी म्हणून आपल्याला स्वछंद जगायचे असते, पण आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याला मात्र आपल्याला पिंजाऱ्यात ठेवायचे असते स्वतःच्या आनंदासाठी. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन! जिवंत पशु पक्ष्याना मारून खाल्ले जाते किती यातना होत असतील त्यांना त्या वेळीस. अश्या प्रकारचे कर्म केल्यावर आपण अजून कोणत्या फळाची अपेक्षा कराल. बिजच कडू असेल तर गोड फळ कुठून मिळणार.

KARMA

भगवान श्री कृष्ण ह्यांनी अर्जुनाला समजावून सांगितले. फळाची आशा न धरता कर्त्यव्य कर्म कर, प्रत्येक गोष्ट ही स्वत: साठीच केली पाहिजे असे नाही. त्यात सगळ्यांचे भले व्हावे हा हेतू असायलाच हवा.

जर आपल्याला आनंद पाहिजे असेल आणि आपण मात्र दुसऱ्यांना दुःख देत असू तर, आपल्याला ही आयुष्यात दुःखच मिळणार ना! आपण जे देऊ तेच आपल्याला परत मिळेल मग ते प्रेम असो, आनंद असो, सन्मान असो, धोका असो हे सर्वकाही परत मिळणारच आहे.

KARMA

कर्म म्हणजे काय?

हे निश्चित सांगणे जरा कठीणच आहे. साधा श्वास घेणे हे ही एक कर्मच आहे.

गीते मध्ये कर्माचे तीन प्रकार दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे. 1) कर्म, 2) अकर्म आणि 3) विकर्म.

कर्म म्हणजे आपण कोणतीही कृती केली की त्याला कर्म ही संज्ञा लागते, मग ती क्रिया किंवा कृती चांगली असो किंवा वाईट. हे कर्म बुद्धी चा वापर करून केले जाते.

अकर्म म्हणजे कोणतीही कृती न करणे. कोणतीही कृती न करणे हे ही एक प्रकारचे कर्मच आहे आणि त्याचे ही फळ भोगावे लागतेच. 

विकर्म म्हणजे ज्यात मनाचा संपूर्ण सहभाग असतो आणि त्यातून हे कर्म होते.

KARMA

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कर्माची गती गहन आहे, ती भल्या भल्या पंडितांनाही उलगत नाही तर तुला कुठून उलगडणार! असे म्हणून भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात मी तुला कर्म बांधनातून सुटण्याची युक्ती सांगतो, तू फक्त कर्म करीत रहा!

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

लेखन:- मनिष महादेव जोशी.

कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

A Horse