When a Faithful Man Deceives us
When a Faithful Man Deceives us विश्वासू माणूस आपल्याला फसवत असतो तेव्हा आपण एखाद्या माणसावर पुष्कळ विश्वास टाकतो अगदी आपल्यापेक्षाही जास्त पण तो माणूस खरोखरच त्या विश्वासास पात्र असतो का? आता कुणावर किती विश्वास टाकावा याचं मोजमाप करणार मशीन अजून पर्यंत तरी बाजारात आलं नाही. त्या त्या वेळेस म्हणजे आपल्या गरजेच्या वेळेस जो आपल्यासोबत ठाम उभा राहतो तो आपल्यासाठी जास्त विश्वास पात्र म्हणजे विश्वासू माणूस ठरतो. पण या विश्वासात त्या माणसाचा स्वार्थ लपला असेल तर! अशी व्यक्ती पहिल्यांदा आपला विश्वास जिंकते. आपल्या स्वप्नांच्या जाळ्यात ती व्यक्ती हळूहळू आपले जाळे विणायला सुरुवात करते. जे स्वप्न आपलं असतं ते स्वप्न त्यांचंही असतं फरक एवढाच असतो किती व्यक्ती आपल्याला अंधारात ठेवत असते, पण आपला त्या व्यक्तीवर असलेला आंधळा विश्वास त्या व्यक्तीने दाखवलेल्या रस्त्यावरून आपल्याला जायला भाग पाडते. कालांतराने आपल्या सोबत राहून राहून काही काळ का असेना त्या व्यक्तीची काही स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होतात स्वप्नांना पंख फुटू लागतात आणि मग चालू होतो तो आपल्या स्वप्नांच जाळ तोडण्याचा खेळ. भिंतीवरच्या ...