When the person gets out of mind!

 When the person gets out of mind!

व्यक्ती मनातून उतरते तेव्हा!

When the person gets out of mind!

आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा त्याच्या पात्रते पेक्षा जास्त मान देतो अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या विरुद्ध वागते, बोलते किंवा दुसऱ्यास वागण्यास भाग पाडते तेव्हा अशी व्यक्ती मनातून उतरून जाते. कारण त्या वेळेस आपल्या विश्वासाला न जोडणारा तडा गेलेला असतो.

त्या व्यक्तीला मात्र याचा काहीच फरक पडत नाही, कारण मुळात ती व्यक्ती त्याच हेतूने तुमच्या संपर्कात आलेली असते. पण असे करताना त्याच्या पंखात किती बळ आहे हे त्या व्यक्तीलाही माहित नसते.

नियतीची मती आणि काळाची गती ही कुणालाच माहित नसते. समोरची व्यक्ती कितीही खालच्या स्थरारावर गेली तरी आपण मात्र तसे वागू नये. प्रत्येलाला आपापल्या कर्माच फळ हे मिळणारच आहे.

अशी माणसं समाजात, नात्यात, कामाच्या ठिकाणी सतत सामोरी येतात आणि आपल्याला त्यांच्या सोबत व्यवहार करावा लागतो.

आपण सर्व सामान्य माणसं आहोत त्यामुळे अहंकार कुरवाळत बसणं आपल्याला परवडण्या सारखं नाही. त्यामुळे आहे ते वास्तव स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं! हे सर्व मी अनुभवातून शिकलोय.

When the person gets out of mind!

आपण अश्या व्यक्तीवर पुष्कळ विश्वास टाकला हा आपलाच गाढवपणा होता, त्याने आपल्याला काही तरी नवीन शिकवलं म्हणून त्याचे मनातल्या मनात आभार मानायचे. पण आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत सावधगिरी बाळगायची.

फसवणूकीचे दुःख, अपमानाने घायाळ होणे ह्या गोष्टी घडतच राहणार लेट गो म्हणायचं आणि सोडून द्यायचं.

आपल्या भविष्यकाळा साठी भूतकाळात अडकून न पडता स्वतःला आवडत्या कामात झोकून द्यायचं. एखाद्याने आपल्याला फसवलं आपलं नुकसान झालं पण शेवटी त्याचंही नुकसान झालंच ना. तो एका चांगल्या नात्याला, चांगल्या मैत्रीला मुकाला.

माझ्या आयुष्यात मी कधी जाणून बुजून कुणावर अन्याय केला नाही किंवा कुणाला फसवलेही नाही. पण माझ्याकडून कळत नकळत कुणाचा अपमान झाला असेल तर? कुणी फसले गेले असेल तर? कुणी दुखावले गेले असेल तर? अश्या वेळेस मीही कुणाच्या तरी मनातून उतरलो असेलच ना!


लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse