Ati Tithe Mati

 Ati Tithe Mati

अति तेथे माती

Ati Tithe Mati

मित्रांनो यश आणि प्रसिद्धी सहजा सहजी मिळत नाही आणि मिळाली तरी काही जणांना ती टिकवून ठेवता येत नाही. मिळालेल्या गोष्टीचा मनुष्यप्राणी अतिरेक करायला लागतो आणि आत्ता पर्यन्त जे काही कमावले त्याची माती करून टाकतो.

एका गावात एक गरीब शेतकरी होता, तो शेतात राबराब रबायचा पण पण निसर्गामुळे म्हणा किंवा त्याच्या नशिबामुळे म्हणा त्याला त्याच्या कामात यश मिळत नव्हत. तो देवाची विनवणी करू लागला. त्याची ती दशा पाहून देवाला फार वाईट वाटले.

एके दिवशी तो शेतकरी आत्महत्येचा विचार करत बसला होता. त्याच वेळी देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला "तुला काय अपेक्षित आहे ते माग, मी तुला ते देईन. धन, धान्य, वस्त्र, गृह, सुख, शांती, यश, प्रसिद्धी काय हवे ते माग, पण जे मागशील ते तुला तुझ्या झोळीत घ्यावं लागेल. मी जे देईन ते घेताना त्यातील एक कण जरी झोळीतून खाली पडला तर सर्व काही नाहीसे होईल."

शेतकऱ्याने विचार केला जर आपल्याकडे धन आले तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला आपसूकच मिळतील. त्याने देवाकडे धनाची अपेक्षा केली आणि आपली झोळी उघडली. त्याचक्षणी देवाने त्याला थोडे धन दिले आणि हे धन तुझ्या साठी आणि तुझ्या परिवारासाठी पुरेसे आहेना असे विचारले. त्यावर शेतक्याने अजून थोडे धन मिळाले असते तर स्वतःचे घर बांधले असते असे देवाला सांगितले, देवाने त्याच्या झोळीत अजून थोडे धन घातले. त्यावर शेतकऱ्याने देवाकडे अजून थोड्या धनाची अपेक्षा केली. शेतकरी अपेक्षा करत गेला आणि देव झोळीत धन टाकत गेला. सरतेशेवटी एक क्षण असा आला की धनाच्या वजनाने शेतक्याची झोळी फाटली. त्याच कशी देव तिथून नाहीसा झाला आणि धन ही नाहीसे झाले.

Ati Tithe Mati

आजच्या स्पर्धेच्या जगात मिळालेले यश आणि प्रसिद्धी टिकवता आली पाहिजे. त्या विपरीत मनुष्य प्राणी उदमत्त हत्ती सारखा वागत चालला आहे, माजत चालला आहे. स्वतःच्या प्रगती साठी दुसऱ्यांच्या खांद्याचा वापर करत चालला आहे. दुसऱ्याचा खांदा वापरा पण एवढा ही नको की खांदा देणाऱ्याचा खांदाच तुटून जाईल.

शिशुपालाचेही शंभर अपराध पूर्ण होई पर्यन्त भगवान कृष्ण शांत बसले होते, जसा शिशुपालाने शंभरावा अपराध पूर्ण केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्रचा वापर करून शिशुपालाचा वध केला.

जास्त अति करणाऱ्याच्या आयुष्यात एक तरी भगवान श्रीकृष्ण येतोच आणि त्याच्या अहंकाराचा वध हा करतोच.

लेखन :- मनिष महादेव जोशी


कोकण कल्चर

Comments

Popular posts from this blog

Anger and Rage

KARMA

A Horse