Ati Tithe Mati
Ati Tithe Mati अति तेथे माती मित्रांनो यश आणि प्रसिद्धी सहजा सहजी मिळत नाही आणि मिळाली तरी काही जणांना ती टिकवून ठेवता येत नाही. मिळालेल्या गोष्टीचा मनुष्यप्राणी अतिरेक करायला लागतो आणि आत्ता पर्यन्त जे काही कमावले त्याची माती करून टाकतो. एका गावात एक गरीब शेतकरी होता, तो शेतात राबराब रबायचा पण पण निसर्गामुळे म्हणा किंवा त्याच्या नशिबामुळे म्हणा त्याला त्याच्या कामात यश मिळत नव्हत. तो देवाची विनवणी करू लागला. त्याची ती दशा पाहून देवाला फार वाईट वाटले. एके दिवशी तो शेतकरी आत्महत्येचा विचार करत बसला होता. त्याच वेळी देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला "तुला काय अपेक्षित आहे ते माग, मी तुला ते देईन. धन, धान्य, वस्त्र, गृह, सुख, शांती, यश, प्रसिद्धी काय हवे ते माग, पण जे मागशील ते तुला तुझ्या झोळीत घ्यावं लागेल. मी जे देईन ते घेताना त्यातील एक कण जरी झोळीतून खाली पडला तर सर्व काही नाहीसे होईल." शेतकऱ्याने विचार केला जर आपल्याकडे धन आले तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला आपसूकच मिळतील. त्याने देवाकडे धनाची अपेक्षा केली आणि आपली झोळी उघडली. त्याचक्षणी देवाने त्याला थोडे