Happiness and Sadness
Happiness and Sadness सुख आणि दुःख म्हणजे काय माझ्यामते सुख आणि दुःख म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू! कोणताही खेळ खेळण्याआधी नाणे उडवून ठरविले जाते कोण पाहिले खेळणार, आणि कोण नंतर. त्याच प्रमाणे जीवनात सुख आणि दुःख ठरवले जाते. वास्तविक पाहता सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख ही परिक्रमा चालूच असते. पण ह्या प्रक्रियेत सर्वाना हवं असतं ते सुखं. सुखाची किंमत कोणालाही नसते किंवा ते जास्त वेळ टिकून राहत नाही असं म्हणाना, पण दुःखा चा बाऊ मात्र नक्कीच केला जातो. संपूर्ण पृथ्वीतलावर दुःखी आपणच अशी काही लोकांची धारणा असते. अशी माणसं एक तर स्वतःला संपवतात तरी नाहीतर व्यसनाच्या मागे लागून संसाराची वाट तरी लावतात. काही माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद म्हणजे सुख शोधतात, पण अशी माणसं क्वचितच आढळतात. सुख आणि दुःख ह्याची वेगळी अशी परिमिती काढता येणार नाही कारण सुख किंवा दुःख हे आपल्या मानण्यावर आहे, थोडक्यात त्यांचा करता करावीत म्हणजे मन. शेवटी आपलं मनच ठरवतं की सुख आणि दुःख म्हणजे काय ते. म्हणजे मनाला आनंद झाला की सुख आणि मन दुखावलं म्हणजे दुःख! सगळा काही मनाचा खेळ....