Posts

Nature

Image
Nature निसर्ग निसर्ग आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा पासून निर्माण झाला आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, पशु, पक्षी, माणसे यांचा समावेश होतो.  निसर्ग आपल्याला पुष्कळ काही देतो पण मनुष्य प्राण्याच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्ती मुळे सामान्यत:हा निसर्गही बदलत चालल्याचे दिसून येत आहे. निसर्ग आपल्याला पूर्ण पणे कळलेला नाही किंबहुना आपण तो कधी समजून घेतलाही नाही. अश्यावेळेस निसर्गाने रौद्र रूप धारण केले की आपण म्हणतो निसर्गाने मानवला अद्दल घडविण्या साठीच हे रूप घेतले आहे. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाचा फटका साक्षात निसर्गालाही बसत असतो. पूर, वादळे ह्यामुळे मनुष्या प्रमाणे झाडे, अन्य प्राणी, पशु, पक्षी जमीन ह्यांचेही नुकसान होते. बऱ्याच अंशी ह्याला मनुष्य प्राण्याला जबाबदार ठरवले तर ते काही चुकीचे ठरणार नाही. निसर्गाचे स्वतःचे अशे अनंत नियम आहेत. त्या सर्व निसर्ग नियमांचा राजा एकाच घोषवाक्यावर काम करत असेल कदाचित ते म्हणजे "क्रिया तशी प्रतिक्रिया". निसर्गात कोणतीही क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया ही हो...

History

Image
 History इतिहास इतिहास म्हणजे भूतकाळात काय घडले ह्याची सुसंगत मांडणी. 'इति+ह+आस' अशी ह्या शब्दाची उत्पत्ती. दुरून पाहिलं तर इतिहास हा काजव्या प्रमाणे वाटू लागतो, पण जस जसे आपण ह्या इतिहासाच्या जवळ जाऊ पाहतो तस तसा तो सूर्या प्रमाणे तेजस्वी वाटू लागतो. इतिहास आपल्याला घडवतो आणि वाचवातोही. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. त्यातील कोणत्याही कालखंडाचा अभ्यास करणे म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूचा सखोल अभ्यास करणे. आता हा अभ्यास कसा करायचा तर भूतकाळातील घटनांची सुसंगत माहिती जमा करायची. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अश्या कालखंडाला समजून घेऊन अभ्यास करायचा. त्यातून आपल्याला पूर्वी माणसं कशी राहत होती. कोणते अन्न खात होती. कोणत्या प्रकारची वस्त्रे न्हेसत होती. त्यांनी स्वतःमध्ये आणि समाजामध्ये कश्या प्रकारे प्रगती केली. त्यांनी कोणत्या चुका केल्या. त्यांची कशी फसवणूक झाली अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहास देतो. ही उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला भौतिक, लिखित आणि मौखिक साधनाचा वापर करावा लागेल. आता...

Giving a shoulder to the deceased

Image
 Giving a shoulder to the deceased मृत व्यक्ती ला खांदा देणे मृत व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे काम आहे असे सुविचार वजा वाक्य मी त्या दिवशी ऐकले. तो दिवस तसा मला जरा गोंधळवून टाकणारच होता, आमच्या इमारतीत जाधव काकांचे मयत झाले होते. सर्व जण इमारतीच्या खाली जमा झाले. मी ही त्या गर्दीत समावलो होतो. वयस्करांना खुर्चीवर बसवणे आणि कुणी विचारले की "काल रात्री पर्यन्त ठीक होते आज सकाळी असं कसं काय झालं कुणास ठाऊक" हे वाक्य सांगण्याचे मी करत होतो. आता याला काम करत होतो असं तर म्हणू शकत नाही. त्यातील एक गृहस्थ विचारू लागले खांदा कोण देणार आहे बहुदा ते जाधव काकांचे नातेवाईक असावेत. त्यावर पाच सहा जण समोर आले मी विचार करू लागलो..... यातल्या एकालाही मी गेल्या चार पाच महिन्यात पहिले न्हवते. जाधव काका गेल्या चार पाच महिन्या पासून आजारी होते, आमच्या समोरच्या घरात ते राहायचे. त्यांना भेटायला कोण येत कोण नाही हे माझ्याशिवाय जास्त चांगलं अजून कुणाला माहित असणार, असो! मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र असले तरी तुम्हाला त्याचे पुण्य मीळणार, आधी जर कोणते पाप केले नसेल तरच! मृत व्यक्तील...

Happiness and Sadness

Image
Happiness and Sadness  सुख आणि दुःख म्हणजे काय माझ्यामते सुख आणि दुःख म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू! कोणताही खेळ खेळण्याआधी नाणे उडवून ठरविले जाते कोण पाहिले खेळणार, आणि कोण नंतर. त्याच प्रमाणे जीवनात सुख आणि दुःख ठरवले जाते.  वास्तविक पाहता सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख ही परिक्रमा चालूच असते. पण ह्या प्रक्रियेत सर्वाना हवं असतं ते सुखं. सुखाची किंमत कोणालाही नसते किंवा ते जास्त वेळ टिकून राहत नाही असं म्हणाना, पण दुःखा चा बाऊ मात्र नक्कीच केला जातो. संपूर्ण पृथ्वीतलावर दुःखी आपणच अशी काही लोकांची धारणा असते. अशी माणसं एक तर स्वतःला संपवतात तरी नाहीतर व्यसनाच्या मागे लागून संसाराची वाट तरी लावतात. काही माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद म्हणजे सुख शोधतात, पण अशी माणसं क्वचितच आढळतात. सुख आणि दुःख ह्याची वेगळी अशी परिमिती काढता येणार नाही कारण सुख किंवा दुःख हे आपल्या मानण्यावर आहे, थोडक्यात त्यांचा करता करावीत म्हणजे मन. शेवटी आपलं मनच ठरवतं की  सुख आणि दुःख म्हणजे काय ते. म्हणजे मनाला आनंद झाला की सुख आणि मन दुखावलं म्हणजे दुःख! सगळा काही मनाचा खेळ....

A Horse

Image
A Horse  झालोच घोडा तर घोड्यावर स्वार होण्याची ईच्छा प्रत्येकाच्या मनात संपूर्ण आयुष्यात एकदा तरी येऊन गेली असेलच ना. खोगीर हे घोड्याच्या पाठीवर पट्ट्याने बांधले जाते आणि त्यावर आरामशीर बसून आपण घोड्याची सवारी करू शकतो. जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये घोड्याचे डोळे सर्वात मोठे असतात. त्यांचे डोळे 360 अंश पाहण्यास सक्षम आहेत परंतु घोडा मनुष्याप्रमाणे लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नाही म्हणूच घोड्याच्या डोळ्याला झापड लावली जाते. नर घोड्याचा जबडा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. नर घोड्याला ४० आणि मादीला ३६ दात असतात. घोडा हा तसा जगभरात आढळणारा प्राणी आहे, त्याच्या बद्दल आपल्याला बरीचशी माहिती असेलही ह्या बद्दल शंका नाही. आता ज्या विषयाबद्दल लिहिणार त्या विषयाबद्दल थोडी तरी माहिती असावी म्हणून हा खटाटोप. मी आज पर्यन्त जंगली घोडे कधी जवळून पहिले नाही. मी पाहिलेल्या घोड्याच्या दोन्ही डोळ्यावर एक झापड लावलेली असते तो घोडा सैरावैरा कुठेही धावू नये म्हणून. अश्या घोड्याना रेसकोर्स वरच्या धावपट्टीत पळवले जाते. लाखोची उलाढाल असते ह्या खेळात. जिवाच्या आकांताने चाबकाचे फटके आणि लगाम खेचली की...

When a Faithful Man Deceives us

Image
When a Faithful Man Deceives us  विश्वासू माणूस आपल्याला फसवत असतो तेव्हा आपण एखाद्या माणसावर पुष्कळ विश्वास टाकतो अगदी आपल्यापेक्षाही जास्त पण तो माणूस खरोखरच त्या विश्वासास पात्र असतो का? आता कुणावर किती विश्वास टाकावा याचं मोजमाप करणार मशीन अजून पर्यंत तरी बाजारात आलं नाही. त्या त्या वेळेस म्हणजे आपल्या गरजेच्या वेळेस जो आपल्यासोबत ठाम उभा राहतो तो आपल्यासाठी जास्त विश्वास पात्र म्हणजे विश्वासू माणूस ठरतो. पण या विश्वासात त्या माणसाचा स्वार्थ लपला असेल तर! अशी व्यक्ती पहिल्यांदा आपला विश्वास जिंकते. आपल्या स्वप्नांच्या जाळ्यात ती व्यक्ती हळूहळू आपले जाळे विणायला सुरुवात करते. जे स्वप्न आपलं असतं ते स्वप्न त्यांचंही असतं फरक एवढाच असतो किती व्यक्ती आपल्याला अंधारात ठेवत असते, पण आपला त्या व्यक्तीवर असलेला आंधळा विश्वास त्या व्यक्तीने दाखवलेल्या रस्त्यावरून आपल्याला जायला भाग पाडते. कालांतराने आपल्या सोबत राहून राहून काही काळ का असेना त्या व्यक्तीची काही स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होतात स्वप्नांना पंख फुटू लागतात आणि मग चालू होतो तो आपल्या स्वप्नांच जाळ तोडण्याचा खेळ. भिंतीवरच्या ...

Anger and Rage

Image
 Anger and Rage राग आणि क्रोध राग आणि क्रोध ह्या दोन शब्दात पुष्कळ फरक आहे. राग आणि क्रोधच्या मध्ये एका टिशू पेपर ची पात्तळ अशी भिंत आहे. त्यात पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी रागाचे रूपांतर क्रोधात झाले म्हणून समजा. भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि क्रोधाच्या अग्नित काम देवाचा अंत झाला भगवान श्रीरामाने समुद्राला धडा शिकवण्या साठी धनुष्यावर बाण चढवीला होता. महाभारतातील युद्ध दरम्यान क्रोधित होऊन भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्म ह्यांच्यावर प्रहार करण्याच्या हेतूने रथाचे चाक उचललेच. युद्धापूर्वी त्यांनी मी हत्यार उचलणार नाही असे सांगितले होते. त्यातून त्यांनी संदेश दिला की प्रसंग - वेळ - परिस्थिती - आवश्यकता - गरज ह्यानुसार माणसाने निर्णय - प्रण - प्रतिज्ञा - निश्चय ह्यात बदल करणे गरजेचे आहे. पौराणिक कथेतून असे ज्ञात होते की अनेकदा देवालाही क्रोध अनावर झाला आहे, पण त्यांनी क्रोधाचा योग्यवेळी आणि योग्य रीतीने वापर केला. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतो. प्रत्येकाला वाटते की आपण जे वागतो ते बरोबर आहे, किंबहुना सर्वांनी माझ्या सारखेच वागले पाहिजे. आता प्र...