Nature

Nature निसर्ग निसर्ग आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा पासून निर्माण झाला आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, पशु, पक्षी, माणसे यांचा समावेश होतो. निसर्ग आपल्याला पुष्कळ काही देतो पण मनुष्य प्राण्याच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्ती मुळे सामान्यत:हा निसर्गही बदलत चालल्याचे दिसून येत आहे. निसर्ग आपल्याला पूर्ण पणे कळलेला नाही किंबहुना आपण तो कधी समजून घेतलाही नाही. अश्यावेळेस निसर्गाने रौद्र रूप धारण केले की आपण म्हणतो निसर्गाने मानवला अद्दल घडविण्या साठीच हे रूप घेतले आहे. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाचा फटका साक्षात निसर्गालाही बसत असतो. पूर, वादळे ह्यामुळे मनुष्या प्रमाणे झाडे, अन्य प्राणी, पशु, पक्षी जमीन ह्यांचेही नुकसान होते. बऱ्याच अंशी ह्याला मनुष्य प्राण्याला जबाबदार ठरवले तर ते काही चुकीचे ठरणार नाही. निसर्गाचे स्वतःचे अशे अनंत नियम आहेत. त्या सर्व निसर्ग नियमांचा राजा एकाच घोषवाक्यावर काम करत असेल कदाचित ते म्हणजे "क्रिया तशी प्रतिक्रिया". निसर्गात कोणतीही क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया ही हो...